पॉवर हाऊस येथील नाल्याची नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची पाहणी
- by Yogesh Bandagale
- January 14, 2026
- 182 views
चिपळूण : शहरातील पॉवर हाऊस परिसरात रिक्षा स्टॅण्ड शेजारी असलेल्या नाल्याची नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांसह पाहणी केली. या वेळी नगर पालिकेच्या ताब्यात असलेले सर्व नाले स्वच्छ असले पाहिजेत, अशी स्पष्ट सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिली.
या पाहणीदरम्यान सौ. सावंत यांनी रस्त्याच्या बाजूला असलेले गटार फुटले असून ते तातडीने दुरुस्त करून द्यावे, अशी मागणी नगराध्यक्षांकडे केली. तसेच या ठिकाणी रिक्षा स्टॅण्ड व पावर हाऊस येथे एस.टी.चा थांबा असल्यामुळे प्रवासी व रिक्षा चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यावर उपाय म्हणून या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह (टॉयलेट) उभारण्याच्या सूचना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिल्या.
नगराध्यक्षांनी सदर नाल्याची व परिसराची साफसफाई तातडीने हाती घ्यावी व सोमवारीच काम सुरू करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.
यावेळी नगरसेवक विकी लवेकर, कपिल शिर्के, निहार कोवळे, उदय जुवळे, शितल रानडे, शिवसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, विजय सावंत, जगदीश गोरे, महेश नरळकर, अजय तांबडे, संतोष खेडेकर, श्रीकांत काते, आदेश केंजळकर, संदेश किंजलकर व संदेश गोरीवाले आदी उपस्थित होते.
तसेच उपमुख्य अधिकारी मंगेश पेढांबकर, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, सुजित जाधव व बांधकाम मिस्त्री रवी सातपुते, बांधकाम विभागाचे अभियंता महेशशेठ डफळ, दीपक निंबाळकर, प्रवीण जाधव यांचीही या वेळी उपस्थिती होती.
