निशा आंबेकर यांची सलग चौथ्या वर्षी राज्यस्तरीय मास्टर्स स्पर्धेत सुवर्णपदकांची लयलूट
- by Yogesh Bandagale
- December 25, 2025
- 72 views
चिपळूण :
चिपळूण : दि. १३ व १४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र मास्टर्स अॅथलेटिक असोसिएशनच्या वतीने संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, भोसरी (पुणे) येथे राज्यस्तरीय मास्टर्स क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये अॅथलेटिक्स, स्विमिंग, पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग, हॉलीबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत चिपळूणच्या सौ. निशा गजानन आंबेकर यांनी 45+ वयोगटात अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत सलग चौथ्या वर्षी सुवर्णपदकांची लयलूट केली असून एकूण ६ सुवर्णपदके आणि १ रौप्य पदक पटकावत चिपळूणचे नाव राज्यपातळीवर उज्वल केले आहे.
या स्पर्धेत त्यांनी गोळाफेक, थाळीफेक, हॅमर थ्रो या तिन्ही मैदानी क्रीडा प्रकारांत सुवर्णपदक मिळवले. तसेच स्विमिंगमध्ये 100 मीटर व 200 मीटर फ्री स्टाईलमध्ये सुवर्णपदक पटकावले, तर पॉवरलिफ्टिंगमध्येही त्यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. 50 मीटर फ्री स्टाईल स्विमिंगमध्ये त्यांनी रौप्य पदक मिळवले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्या स्पर्धेतील सर्वाधिक पदके मिळवणाऱ्या खेळाडू ठरल्या. त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र मास्टर्स अॅथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री. बाळू चव्हाण यांनी त्यांचे विशेष कौतुक केले असून, त्यांच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
सौ. निशा गजानन आंबेकर (पूर्वाश्रमीच्या वैजयंता कुलकर्णी) या व्यवसायाने करसल्लागार व प्रमाणित लेखापरीक्षक असून त्यांनी M.Com, MBA (Finance), GDC&A असे उच्च शिक्षण घेतले आहे. शाळा व महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना खेळाची विशेष आवड होती. त्या काळात त्यांनी 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर धावणे, थाळीफेक, गोळाफेक, हॅमर थ्रो तसेच पॉवरलिफ्टिंग या प्रकारांमध्ये जिल्हा, राज्य, विद्यापीठ व आंतर-विद्यापीठ स्तरावर अनेक पदके मिळवली होती. पॉवरलिफ्टिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची निवड होऊनही निधीअभावी त्यांना त्या स्पर्धेत सहभागी होता आले नाही.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी NCC मधील “C” सर्टिफिकेट मिळवले. NCC अंतर्गत त्यांनी स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण घेतले असून, स्कुबा डायव्हिंग करणाऱ्या त्या भारतातील तिसऱ्या, महाराष्ट्रातील दुसऱ्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा ठरला.
लग्नानंतर त्यांनी क्रीडा क्षेत्रातून काही काळासाठी विश्रांती घेत करसल्लागार व प्रमाणित लेखापरीक्षक म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली. गेली १८ वर्षे त्या या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. मात्र त्यांची धाडसी वृत्ती व सामाजिक बांधिलकी कायम राहिली. महापुरासारख्या आपत्तीच्या काळात बचाव कार्य अधिक सक्षम करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणांतर्गत वाशिष्ठी नदीत यांत्रिकी बोट चालवण्याचा सराव देण्यात आला. त्यामध्ये सौ. निशा आंबेकर यांनी यांत्रिकी बोट यशस्वीपणे चालवत दिलेले अंतर पार केले असून सध्या त्या आपत्ती व्यवस्थापन टीममधील एकमेव महिला सदस्य आहेत.
सुमारे २२ वर्षांनंतर त्यांनी पुन्हा फिटनेससाठी सायकलिंग आणि क्रीडा सराव सुरू केला. गेल्या वर्षी शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय खेलो मास्टर्स स्पर्धेत ४० वर्षांपुढील वयोगटात त्यांनी स्विमिंग व मैदानी क्रीडा प्रकारांत एकूण ८ पदके मिळवली. त्यानंतर गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी ३ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य पदक पटकावले. नोव्हेंबर २०२३ मध्ये स्विमिंग व मैदानी स्पर्धांत त्यांनी ३ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य पदक मिळवत राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड मिळवली.
फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांनी 200, 300, 400 आणि 600 किलोमीटर सायकलिंग पूर्ण करून सायकलिंग क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा “Super Randonneur” हा किताब पटकावला. २०२३ मध्ये त्यांनी पंढरपूर सायकल वारी तसेच गोवा सायकल फन राइडमध्ये सहभाग घेतला. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी कोल्हापूर येथे झालेल्या लोहपुरुष स्पर्धेत रिले प्रकारात 2 किलोमीटर स्विमिंग 1 तास 5 मिनिटांत पूर्ण करून त्या लोहपुरुष रिलेच्या मानकरी ठरल्या. तसेच ९ नोव्हेंबर २०२५ रोजी गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन स्पर्धेत रिले प्रकारात समुद्रात 2 किलोमीटर स्विमिंग 48 मिनिटांत पूर्ण करत त्यांनी आयर्न मॅन (रिले) पदक मिळवले.
त्यांच्या या धाडसी आणि बहुआयामी कार्यासाठी त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. दि फ्रेश न्यूज कडून “स्वयंसिद्धा” कर्तृत्ववान महिला पुरस्कार, सातारा संस्थांचा जीवन गौरव पुरस्कार, चिपळूण डॉक्टर्स असोसिएशनचा महिला सन्मान पुरस्कार, महिला मंडळ वडनाका चिपळूणकडून कर्तृत्ववान महिला पुरस्कार, २०२३ साली राज्य अधिवेशनात कोकण विभागातून दुसरा व रत्नागिरी जिल्ह्यातून पहिला “सर्वोत्कृष्ट लेखापरीक्षक” पुरस्कार, डिसेंबर २०२२ मध्ये रत्नागिरी करसल्लागार असोसिएशनचा Sports Activity सन्मान, मार्च २०२४ मध्ये राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारिरत्न पुरस्कार, डिसेंबर २०२४ मध्ये इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचा भारत विकास रत्न पुरस्कार, तसेच एप्रिल २०२५ मध्ये कोल्हापूर येथे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते Business Woman of the Year हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. याशिवाय मा. आमदार शेखर निकम यांच्या हस्तेही त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
क्रीडा, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात समान ताकदीने काम करणाऱ्या सौ. निशा आंबेकर या विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय असून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत, व्यसनाधीन व्यक्ती व त्यांच्या कुटुंबांसाठी विशेष कार्य, तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान देत आहेत. शिवाय पाककला व केक स्पर्धांमध्येही त्यांनी अनेक बक्षिसे पटकावली आहेत. क्रीडाभारती, संस्कृतभारती, चिपळूण सायकलिंग क्लब, परिमल मंडळ आदी संस्थांमध्ये त्या विविध पदांवर कार्यरत आहेत.
एकूणच सौ. निशा आंबेकर यांची ही प्रेरणादायी यशोगाथा जिद्द, शिस्त, धाडस आणि सातत्य यांचे उत्तम उदाहरण ठरत असून त्यांच्या कार्यामुळे चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा नावलौकिक वाढला आहे.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत चिपळूणच्या सौ. निशा गजानन आंबेकर यांनी 45+ वयोगटात अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत सलग चौथ्या वर्षी सुवर्णपदकांची लयलूट केली असून एकूण ६ सुवर्णपदके आणि १ रौप्य पदक पटकावत चिपळूणचे नाव राज्यपातळीवर उज्वल केले आहे.