डीबीजे कॉलेजसमोर विद्यार्थ्यांमध्ये रस्त्यातच दादागिरी व हाणामारी
- by Yogesh Bandagale
- September 21, 2025
- 676 views
चिपळूण: डी. बी. जे. कॉलेज समोरील रस्त्यावर विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पट्टेरी टी-शर्ट घातलेले विद्यार्थी आणि त्याच्या शेजारी पांढरा टी-शर्ट व चष्मा घातलेला विद्यार्थी यांनी एका मुलाला रस्त्यातच उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. त्याचवेळी त्यांचा कदाचित मित्र असलेला विद्यार्थी या घटनेला विरोध करत होता. मात्र, त्यालाही "तुला देखील उठाबशा काढाव्या लागतील" असा दम दिला जात असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसून आले आहे.
यानंतर काही अन्य विद्यार्थ्यांनी या मुलास दादागिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चांगलीच मारहाण केली. अचानक झालेल्या या हाणामारीमुळे रस्त्यावर गोंधळ उडाला होता.
या घटनेतून सार्वजनिक शांततेचा भंग, दादागिरी, गर्दी मारामारी व दहशत माजविणे असे गंभीर प्रकार समोर आले असून, संबंधित विद्यार्थ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
