चिपळूणमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धा
- by Yogesh Bandagale
- December 03, 2025
- 84 views
चिपळूण : अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा चिपळूणतर्फे विविध सांस्कृतिक व नाट्यविषयक उपक्रम राबवले जातात. यावर्षी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. ४ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. एकपात्री अभिनयासाठी ४ ते ६ मिनिटे तर द्विपात्री अभिनयासाठी ५ ते ७ मिनिटांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
पारितोषिकांमध्ये एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक ₹१,०००, द्वितीय ₹७०० तर तृतीय ₹५०० असेल. द्विपात्री अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक ₹१,५००, द्वितीय ₹१,००० तर तृतीय क्रमांक ₹७०० पारितोषिक देण्यात येईल. चिपळूण शहर व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले आहे.
