रेल्वेप्रमाणेच प्रवाशांना कळणार एसटीचे लोकेशन
- by Yogesh Bandagale
- October 17, 2025
- 70 views
मुंबई : रेल्वेप्रमाणे आता एसटीच्या प्रवाशांनाहीआपल्याला गरज असलेल्या एसटी बसचेलोकेशन अचूक मिळवता येणार आहे.एसटीने यासाठी ‘आपली एसटी’ हे ॲपविकसित केले आहे. यासाठी बीटीएस(बस ट्रॅकिंग सिस्टिम) एसटी बसेसलाबसवली जाणार आहे. राज्यात १२ हजारबसेसबरोबरच बीड जिल्ह्यातील ५०८बसेसना बीटीएस यंत्र बसवले जाईल.आठवडाभरातच एसटीची ही सेवाऑनलाइन होणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनमहामंडळाने प्रवाशांसाठी ‘आपली एसटी’नावाचे नवे ॲप लाँच केले आहे.रोजमाल्टा ऑटोटेक लि. या कंपनीच्यासहकार्याने हे ॲप विकसित करण्यात आलेआहे. या ॲपमुळे प्रवाशांना जवळच्याबसस्थानकांची माहिती, बसचे वेळापत्रकआणि थेट लाइव्ह ट्रॅकिंग करता येणारआहे. राज्यभरातील १ लाख मार्ग आणि १२हजार बसची माहिती यामध्ये उपलब्धकरून दिली जाणार आहे. त्यामुळेप्रवाशांना तासन्तास थांबावे लागणार नाही.याबरोबरच हे ॲप प्रवाशांच्या सुरक्षेसाठीआपत्कालीन संपर्क क्रमांक आणि मदतसुविधा देण्यात आली आहे. अपघात किंवासंकटातही मदतकार्य मिळवण्यासाठीगरजेचे ठरणार आहे. दरम्यान, प्लेस्टोअरवर ॲप मिळणार असून डाऊनलोडकरता येते. हे ॲप मोफत उपलब्ध करूनदेण्यात आले आहे. याच ॲपच्यामाध्यमातून पुढील काळात तिकीटबुकिंगचीही सुविधा उपलब्ध होणार आहे.हा पुढील टप्पा असणार आहे.
प्रवाशांना वेळेचे नियोजन करता येईल
एसटीचे लाइव्ह लोकेशन मिळाल्याने प्रवाशांचा बसची वाटपाहण्याचा त्रास वाचतो. त्यामुळे वेळेची बचत होते आणिप्रवाशांना बस नेमकी कुठे आहे हे समजते. यामुळे प्रवासअधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होतो. कारण प्रवाशांना बसस्टॉपवर बराच वेळ थांबावे लागत नाही आणि ते आपल्यावेळेचे नियोजन करू शकतात, असे एसटीच्या विभागनियंत्रकांनी सांगितले.
चालक-वाहकांचे संपर्क क्रमांक
या ॲपमध्ये बसचा मार्ग, बस क्रमांक राहणार आहे. त्यानंतरचालक तसेच वाहक या दोघांचे संपर्क क्रमांक, आरक्षणअसल्यास एसटीचे लोकेशन जवळ आल्यावर प्रवाशांच्यामोबाईलवर संदेश मिळणार आहे. तिकीट आरक्षण केलेल्याबसचा क्रमांक आणि थेट माहिती मिळण्याची सोयही उपलब्धराहणार आहे.
व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिमसॉफ्टवेअर प्रणाली
व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम(व्हीटीएस) ही एक सॉफ्टवेअरप्रणाली आहे. जीपीएस तंत्रज्ञानाचावापर करून वाहनांचे ठिकाणतसेच हालचाल यावरही सिस्टिमनियंत्रण ठेवते. ही प्रणालीवाहनांमध्ये बसवलेल्या जीपीएसउपकरणांच्या मदतीने रिअल-टाइममाहिती गोळा करते. याबद्दलसंबंधित यंत्रणेला वाहनांच्याभौगोलिक स्थानाबद्दल तपशीलवारमाहिती देते. याचा उपयोग एसटीबसेससाठी होणार आहे.
