राज ठाकरे यांचा एल्गार : “महाराष्ट्राच्या मतदारयादीत ९६ लाख खोटे मतदार; निवडणुकीत मॅच फिक्सिंग!”

मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील गोरेगाव नेस्को ग्राउंडवर आयोजित केलेल्या भव्य मेळाव्यात सत्ताधारी पक्षांवर आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. राज्यभरातील सर्व मतदारयादी प्रमुख, गटप्रमुख आणि महत्त्वाचे पदाधिकारी या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित होते.


“९६ लाख खोटे मतदार राज्यात भरले!”

राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत महाराष्ट्राच्या मतदारयादीत तब्बल ९६ लाख बोगस मतदारांची नावे भरली गेली आहेत. मुंबईत ८ ते १० लाख, ठाण्यात ८ लाख, आणि असेच प्रत्येक जिल्ह्यात खोटे मतदार आहेत. १ जुलै रोजी त्यांनी मतदारयादी बंद केली आणि त्यानंतर हा मोठा गोंधळ झाला,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “अशा पद्धतीने निवडणुका होत असतील तर हा राज्यातील जनतेचा आणि मतदारांचा अपमान आहे.”


“निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाले आहे”

राज ठाकरे यांनी निवडणुकीतील प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, “मॅच फिक्सिंग झालेले आहे! तुम्ही मतदान द्या किंवा नका द्या, निकाल आधीच ठरलेले असतात. मग सांगतात — ‘यांचा एक आमदार निवडून आला नाही, खासदार आला नाही.’ अरे कसा येणार, तुम्ही आधीच फिक्सिंग करून ठेवले आहे,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला.


“विधानसभा निकालानंतर सन्नाटा — लोक अवाक!”

राज ठाकरे म्हणाले, “२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे २३२ आमदार निवडून आले. पण तरीही राज्यभरात सन्नाटा पसरला होता. कुठेही मिरवणुका नाहीत, जल्लोष नाही. मतदार आणि निवडून आलेलेही अवाक झाले होते — ‘मी कसा निवडून आलो?’ हे त्यांनाच समजले नाही. यावरूनच लोकांना समजले की देशात निवडणुका कशा झाल्या आहेत.”


“निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा गुलाम?”

राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरही थेट आरोप केला. “आम्ही निवडणूक आयोगाशी बोललो की सत्ताधाऱ्यांना राग येतो, कारण त्यांनी ‘शेण खाल्ले आहे’. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा गुलाम नाही. मतदानयादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊच नयेत,” असे ठणकावून ते म्हणाले.


“भुमरेंच्या वक्तव्याने उघड झाली वास्तवता”

आपले म्हणणे अधोरेखित करताना राज ठाकरे म्हणाले, “सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे बेधडक बोलणे हीच पुरावा आहे. विलास भुमरे यांनी स्वतःच्या भाषणात सांगितले की त्यांनी बाहेरून २० हजार मतदान आणले. इतक्या उघडपणे सत्ताधारी आमदार लोकशाहीच्या नियमांची थट्टा करत आहेत,” असे ते म्हणाले.


निष्कर्ष

संबंधित लेख