संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर हॉलिडे एक्स्प्रेससाठी थांबा देण्याची मागणी
- by Yogesh Bandagale
- January 11, 2026
- 115 views
संगमेश्वर : निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या सदस्यांनी ७ जानेवारी २०२६ रोजी रत्नागिरी येथील रेल्वे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर हॉलिडे एक्स्प्रेससाठी थांबा देण्याची आग्रही मागणी केली.
संगमेश्वर तालुक्यातील १९६ गावातील प्रवाशांचा सुखकर प्रवास होण्यासाठी आणि होळी उत्सवाच्या काळात रेल्वेच्या सोयी सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने हे निवेदन सादर केले गेले. चर्चेदरम्यान प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा विचार करून उत्पन्न वाढीसह सुखकर प्रवासाची आवश्यकता अधोरेखित केली गेली. मात्र, फुकट प्रवाशांच्या बेजबाबदार वर्तनामुळे रेल्वेला होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचेही अधिकारी सूचित केले.
या बैठकीत ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन, रुपेश मनोहर कदम, अशोक मुंडेकर सहभागी झाले होते. ग्रुपचे सदस्य म्हणतात की, हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसला संगमेश्वर रोडवर थांबा मिळाला तर तालुक्यातील हजारो प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल.
